नाशिक : राज्यांत सत्तांतर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का देत आहेत. असाच एक धक्का देण्याची तयारी शिंदेंनी केली असून नाशिक संपर्क प्रमुख संजय राऊत यांचे निकटवर्तीय शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाऊ चौधरी हे शिंदे गटात दाखल होणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आज रात्री 9.30 वाजता हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. संजय राऊत यांचे हे निकटवर्तीय त्यांची सावली भाऊ चौधरी गेल्याने हे पक्षांतर महत्वाचे ठरत आहे. संजय राऊत यांचे आजारपण तसेच कोर्टाच्या वेळी भाऊ चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातलं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश होणार असून कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती.
राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच संजय राऊत यांच्यासोबत भाऊ चौधरी कायम सोबत असायचे उद्धव ठाकरेंसाठी जोरदार किल्ला लढवत होते, शिवसेनेत फूट पडली तेव्हाही राऊतांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर घणाघात केला. या आमदारांनी शिवसेनेतल्या फुटीलाही संजय राऊत यांना जबाबदार धरलं होतं. मात्र आता संजय राऊत यांना आपल्या एकेकाळच्या निष्ठावंत मित्रावर भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
अधिवेशन सुरू असतानाच मोठा धक्का
राऊतांचा निकटवर्तीय कोण हे आता स्पष्ट झाले असून एकनाथ शिंदे ऐन हिवाळी अधिवेशनात ठाकरेंना जोरदार धक्का मानला जात आहे. याआधी जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड करत वेगळा गट स्थापन केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत पायउतार व्हावे लागले. यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंसोबत शिवसेनेचे 18 पैकी 13 खासदारही गेले. तसंच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवरही आपला दावा ठोकला. राज्यभरात अनेक कार्यकर्ते पदाधिकारी गळाला लावत शिंदे यांनी ठाकरेंना जेरीस आणले आहे.
शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टानंतर निवडणूक आयोगात असून निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धन्युषबाण हे चिन्ह गोठवलं असल तरी भविष्यात हे चिन्ह कुणा गटाला जाणार याकडे लक्ष लागून आहे. तसंच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं. तर एकनाथ शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं मात्र शिंदेंनी राज्यात पक्षांतराचा धडाका लावला असून मोठ्या प्रमाणात ठाकरेंना धक्के दिले आहेत.
भाऊ चौधरी यांची हकालपट्टी
संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली की शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम