Big News | पन्हाळगडावर अचानक आले पोलीस; प्रेमीयुगुलांची उडाली तारांबळ

0
17

Big News | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता किल्ला आहे.या पन्हाळगडावर रोज शेकडो पर्यटक येत असतात. शिवकालिन स्वराज्यातील ऐतिहासिक असा किल्ला म्हणून सगळीकडे पन्हाळगडाची ओळख आहे. परंतु, काही दिवसांपासून गडावर प्रेमीयुगुलांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला आहे.महाराजांच्या गडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलांकडून अश्लिल चाळे केले जातात.(Big News)

Pune News | पुण्यातील माजी नगरसेविकेला धमकावून मित्राने केला अत्याचार

शुक्रवारी (७ ऑक्टोबर)म्हणजेच काल दुपारच्या सुमारास एका प्रेमीयुगुलाने गडावरुन उडी घेत थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच शनिवारी म्हणजेच आज अचानक निर्भया पथकाने पन्हाळगडावर धडक मारली. पोलिसंनी पन्हाळगडावर धडक मारताच प्रेमीयुगुलांची चांगलीच तारांबळ उडाली.यावेळी घरी न सांगता गडावर फिरायला आलेल्या प्रेमी तरुणांची पोलिसांनी चौकशीदेखील केली. तसेच अनेक प्रेमीयुगुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. यापुढे परवानगी घेऊनच पन्हाळगडावर फिरायला या, असा दमच पोलिसांनी प्रेमीयुगुलांना दिलेला आहे.
काल पन्हाळगडावर नेक्की घडलं काय?
पन्हाळगडावर फिरायला आलेल्या एका प्रेमीयुगुलाने शुक्रवारी (७ ऑक्टोबर)म्हणजेच काल दुपारच्या सुमारास पन्हाळगडावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. दोघांनीही एकमेकांचे हात हातात घेऊन गडावरुन दरीत उडी मारली होती. ही बाब पन्हाळगडावर फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांच्या लक्षात आली.त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती कोल्हापुर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस पन्हाळगडावर दाखल झाले. पोलिसांनी दरीत पडलेल्या प्रेमीयुगुलांना बाहेर काढत उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. हे प्रेमीयुगुल राधानगरी तालुक्यातील एकाच गावातील राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गेली काही वर्ष दोघे एकत्रित गडांवर ट्रेकिंग करत होते.अशी देखील माहिती तपासात समोर आलेली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here