राज्य सरकारचा मोठा निर्णय, काजू, मोहाच्या दारूला विदेशी मद्याचा दर्जा

0
25

  • निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू विदेशी दारूच्या दुकानातही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. काजू आणि मोहाची फुलांपासून बनणाऱ्या दारूला “विदेशी दारू’चा दर्जा देण्याचा निर्णय मत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाया जाणाऱ्या व नाशवंत अशा उत्पादनांचा वापर होऊन, त्यांची मुल्यवृद्धी होईल. याचा फळे, फुले उत्पादकांना लाभ होणार आहे.

महसूल वाढीसाठी एफएल-2 परवान्यातून मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. काजूबोंडे, मोहाच्या फुलांपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य दर्जा देण्यात आला. तर फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण राज्य सरकारने आखले आहे.

एफ.एल.-2 परवानाधारकांकडे विहीत मर्यादेपेक्षा अधिक जागा आहे, अशांना श्रेणीवाढीचा लाभ घ्यायचा असल्यास परवान्याची वरील दोन पैकी एका उपवर्गात श्रेणीवाढ करण्याची मुभा असेल.या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, मद्य विक्रीची कक्षा दुकानाचा विस्तार वाढवू शकतो. अतिउच्च दर्जाची मद्यविक्री अनुज्ञप्ती” या परवान्यासाठी किमान जागा (इलाईट) 600 चौरस फुटांपर्यंत वाढवू शकतात तर उच्च दर्जाची मद्यविक्री अनुज्ञप्ती” या परवान्यासाठी जागा (सुपर प्रिमियम) 600 चौरस फुटांच्या वरती वाढवता येणार आहे. हा निर्णय महसूल वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here