मुंबई : जेव्हा मराठीतला या वादग्रस्त शोची घोषणा झाली. तेव्हापासून सर्वच जण ह्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘बिग बॉस मराठी’ शोचे चौथे सीझन आजपासून प्रेक्षकांच्या घेतील येत आहे.
छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय शोच्या यंदाच्या पर्वात प्रेक्षकांना अनेक धक्के पाहायला मिळणार आहेत. यासाठी शोमधील स्पर्धकांना १०० दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बिग बॉस मराठीचे घर पुन्हा एकदा भव्यदिव्य स्वरुपात सज्ज झालेले आहे. ह्या घराचे काही फोटो समोर आले असून, हे फोटो पाहून प्रेक्षकांना जुन्या काळाची आठवण येणार आहे.
बिग बॉसच्या घराला यंदा चाळीचे स्वरूप देण्यात आलेले आहे. ‘चाळ संस्कृती’ यावर आधारित यंदाचे हे घर असणार आहे. यात मागील सर्व सीझनप्रमाणे सर्व सुविधा यंदाही असणार आहेत. पण यात वेगळेपण दिसून आले आहेत. घरात प्रवेश करताच समोर पारंपारिक तुळशी वृंदावन आहे. आणि बाहेरचा जो काही सेटअप केला आहे, तो पाहून प्रेक्षकांना जुन्या काळाची आठवण येणार आहे.
घराच्या आत व बाहेर विविध प्रकारची आकर्षक कलाकृती करण्यात आलेली आहे. त्यात बाहेरच्या आवारात मराठमोळ्या फेट्यांची आरास, सजावटीत कटिंग चहाचे कप, योगा एरियात कॅरम व विविध खेळांच्या साहित्याचा वापर करून केलेली सजावट लक्षवेधी ठरत आहे. ह्यात विशेष आकर्षण असणार आहे, ते घरातील बाल्कनी. यंदाच्या घरात बाल्कनी असून त्याची विशेष अशी सजावट करण्यात आलेली आहे.
तसेच ह्या घरातील वाॅश बेसिनची जागा हिरवळीने सजलेली असून त्यात वाघांच्या देखण्या डोळ्यांचे सुंदररीत्या काढलेले चित्र सर्वांच्या नजरेस पडत आहेत. याचसोबत पान्यांची केलेली सजावटही आकर्षक ठरत आहे. तर लीव्हिंग एरियाला गुलाबी रंग देण्यात आला असून, त्याला फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. तसेच रूममधील मोराची नक्षी असलेल्या नथीची आरास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
घरातील एक महत्त्वाची जागा म्हणजे किचन. यंदाच्या घराच्या किचनला नवा लूक देण्यात आला आहे. त्यात मातीची सुंदर भांडी, भिंतीवर सजवून त्याने स्वयंपाक घर सुशोभित करण्यात आले आहे. तसेच भिंतीवर मोठे मोदक, करंज्या असे विविध मराठमोळे पदार्थ दिसत आहेत. ज्याने या घराला एक वेगळीच शोभा मिळवून दिली आहे.
ह्याचसोबत घरातला मुख्य हॉल अनेक मुखवट्यांनी आकर्षक ठरत आहे. घरातील प्रत्येक भागात सुंदर व देखणी सजावट यंदा केली आहे.
पुढील १०० दिवस हा कार्यक्रम रंगणार असून यंदा घरात भांडण नसल्याचे बोलले जात आहे. तसेच यंदाच्या पर्वात सामान्य नागरिक दिसणार असण्याची शक्यता आहे. ह्या शोचे सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम