
देवळा : भऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत झालेल्या अपहार प्रकरणी आमदार डॉ राहुल आहेर व शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड व महाराष्ट्र बॅंकेचे कार्यपालक निदेशक विजयकुमार यांची सोमवारी(दि ५) रोजी औरंगाबाद येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.

येत्या आठ दिवसांत बॅंकेचे कार्यपालक निदेशक विजयकुमार हे भऊर बॅंकेत तक्रार निवारण करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले . भऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील आर्थिक अपहार प्ररकरणाची जबाबदारी स्वीकारून बँकेने त्वरित फसवणूक झालेल्या खातेदारांचे पैसे वापस करावे, अशी मागणी बँकेचे प्रबंधक श्रीराम भोर यांच्या कडे गेल्या महिन्यात संबंधित ग्राहकांनी केली होती.
मात्र , यावर अद्याप दखल घेतली गेली नसून, फसवणूक झालेल्या ग्राहकांना पैसे अदा करण्यात आले नाहीत .याची उच्च स्तरीय चौकशी होऊन लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी आमदार डॉ राहुल आहेर यांच्यासह शिष्टमंडळाने सोमवारी(दि ५) रोजी औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड व महाराष्ट्र बॅंकेचे कार्यपालक निदेशक विजयकुमार यांची भेट घेऊन ,निवेदन सादर केले .
यावेळी भऊर महाराष्ट्र बँकेत झालेल्या कथित अपहरण संदर्भात चर्चा करण्यात येऊन ग्राहकांना तात्काळ दिलासा मिळाला अशी मागणी करण्यात आली . औरंगाबाद येथे झालेल्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत याची दखल घेण्यात आली असून,येत्या आठ दिवसात येथे बँकेचे कार्यपालक निदेशक विजयकुमार हे बँकेत येऊन तक्रार निवारण करणार आहेत . यामुळे संबंधित शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले आहे.
या शिष्टमंडळात भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , रवींद्र कापडणीस ,राजेंद्र निकम सुधाकर पवार , राजेंद्र पवार, भरत पवार , जयवंत निकम ,निंबा पवार ,विजय पवार, साहेबराव पवार , रविंद्र शिंदे, प्रशांत चव्हाण , पुंडलीक पवार अशोक आहेर ,नानाजी पवार , साहेबराव रौद्ल,अशोक निकम, भाऊसाहेब वाघ , संदीप पवार,नंदू पवार,जितेंद्र आहेर, शरद गरुड आदींचा समावेश होतो.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संभाजीनगर येथे हॉटेल रामा इंटरनॅशनल मधे राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या उच्चस्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित केलेली होती, यावेळी भऊर महाराष्ट्र बँकेतील फसवणूक झालेल्या खातेदारांच्या शिष्टमंडळा बरोबर केंद्रीय अर्थ राज्य मंत्र्यांची भेट घेऊन हा गंभीर प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला .त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र बँकेचे कार्यपालक निदेशक विजयकुमार यांच्यासोबत चर्चा केली व तात्काळ चौकशी करून खातेदारांना न्याय देण्याचे निर्देश दिलेत. बँकेचे वरिष्ठ अधिकारी विजयकुमार यांनी आठ दिवसांत स्वतः भऊर येथे येऊन चौकशी करून खातेदारांना त्वरित न्याय देऊ असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.
– आमदार डॉ राहुल आहेर ,देवळा चांदवड
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम