देवळा ; भऊर येथील महाराष्ट्र बँकेत रोजनदारीवर कार्यरत असतांना आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन सुमारे १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आरोपी भगवान ज्ञानदेव आहेर (रा लोहोणेर ता देवळा ) याच्या विरोधात भादवी कलम ४२०, ४६७, ४६८, ४०६, ४०८, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी फरार असून . देवळा पोलीस त्याच्या शोध घेत आहेत . त्याला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक दिलीप लांडगे यांनी दिली . या घटने बाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि , तालुक्यातील भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भगवान ज्ञानदेव आहेर (रा लोहोणेर ता देवळा ) हा सण २०१६ पासून ते ८/७/२०२२ पावेतो रोजनदारीवर कार्यरत होता . त्याने त्याचा पदाचा गैरफायदा घेऊन ठेवीदार ,खातेदार यांचा विश्वास संपादन करून बँकेतील जवळपास ३२ खातेधारकांच्या खात्यावरील पीक कर्जाची रक्कम घेऊन बँकेच्या सही शिक्का असलेल्या स्वतः हस्तलिखित पेनाने लिहिलेल्या मुदत ठेवीच्या पावत्या बनावट तयार करून त्या बँके ठेवीदारांना त्त्यांचेकडील रक्कम स्वीकारून अदा केल्या . व सदरची रक्कम बँकेत जमा न करता स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जवळपास १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपये एवढी रक्कम बाळगून अपहार केल्याचे उघडकीस आले असून ,या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मालेगाव येथील बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून , आरोपीच्या विरोधात अफ़रातफ़रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान ,संबधीत आरोपी फरार असून ,पोलीस त्याचा शोध घेत आहेत . अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांगेड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही आर देवरे आदी करीत आहेत .सहकारी बँक , पतसंस्थेत आर्थिक घोळ झाल्याचे व पैसे बुडाल्याचे चित्र नागरिकांनी बघितले आहे . मात्र राष्टियकृत बँकेत अशा प्रकारे अपहार होत असेल तर नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवावा .
ग्रामीण भागात काबाड कष्ट करून , पोटाला चिमटी देत आपली पुंजी बँकेत ठेवतात . त्यालाही सुरक्षितता नाही . अशी खंत नागरिक व्यक्त के;ली असून , भऊर येथिल महाराष्ट्र बँकेतुन अपहार झालेली रक्कम संबंधित खातेदारांना तात्काळ मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांनी केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम