देवळा : दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी एकूणच ही निवडणूक खडतर असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारती पवार या चांदवड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना एका ठिकाणी ग्रामस्थांनी विरोध केल्याची घटना ताजी असतानाच आता देवळा तालुक्यात त्यांना पुन्हा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, आज भारती पवार या देवळा तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना उमराणे येथे संतप्त शेतकऱ्यांकडून त्यांची सभा उधळून लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत डॉ. भारती पवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलणे टाळले आहे.
भारती पवार यांच्या गेल्या पाच वर्षातील कामकाज आणि एकंदरीत बोटचेपी भूमिकेमुळे त्यांना या निवडणुकीत ठिकठिकाणी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक जिल्हा असून, कांदा निर्यात बंदीमुळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, यावर लोकप्रतिनिधी म्हणून खासदार डॉ. भारती पवार या सत्तेत असूनही गेले वर्षभर त्या मूग गिळून गप्प राहिल्या, अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आहेत.
Bharti pawar | एक रुपयाचेही कर्ज नाही, संपत्तीत दुपटीने वाढ; एकूण संपत्ती किती..?
पवारांच्या विजयाला सुरूंग देवळा तालुक्यातून..?
तसेच भारती पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कधीही संसदेत आवाज उठवला नाही किंवा त्यांनी गेल्या पाच वर्षात दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, यामुळे त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याचा प्रत्यय आज भारती पवार यांना देवळा तालुक्यातील उमराणे येथे आला.
आज भारती पवार या देवळा तालुका दौऱ्यावर असताना जेथून त्यांना कधीकाळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून देण्यात आले होते. त्या उमराणे येथेच त्यांना शेतकरी व ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. या सभेत कांदा आणि पाणी प्रश्नावरून वातावरण तापले आणि सवाल करत शेतकऱ्यांनी भारती पवार यांना धारेवर धरले. तसेच संतप्त गावकऱ्यांनी निषेध व्यक्त करत पवार यांचे विरोधी उमेदवार भास्कर भगरे आणि राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने व सभेत गोंधळ माजल्याने पवार यांना भाषण आवरते घ्यावे लागल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Bharti Pawar | भारती पवारांना नेटकऱ्यांचा कुठे विरोध तर कुठे पाठिंबा..?
Bharti Pawar | भारती पवार यांची सभा उधळली..?
गेल्या वर्षभरापासून कांद्याचे भाव कोलमडलेले आहेत. शेतकरी संकटात आहेत. भारती पवार या कांदा उत्पादक पट्ट्याच्या लोकप्रतिनिधी असून, त्यांना केंद्रातही मंत्री पद आहे. मात्र असे असूनही त्यांनी कधीही शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका न घेतल्याने त्यांच्या या पदांचा त्यांनी शेतकरी हितासाठी कधीही उपयोग केला नाही किंवा त्या कधीही शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरल्या नाही, अशी संतप्त भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी मांडली आहे.
उमराणे येथून डॉ. भारती पवार या जिल्हा परिषद सदस्य देखील राहिल्या आहेत. तसेच देवळा तालुक्यात भाजपचेच आमदार आहेत. मात्र, तरीही आज येथूनच त्यांना विरोध झाल्याने भारती पवारांच्या विजयाला देवळा तालुक्यातून सुरूंग लागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज उमराणे येथे भारती पवार यांची सभा ठेवण्यात आली होती. मात्र, गावकऱ्यांनी ही सभा उधळून लावली असून, या सभेत गोंधळ माजल्याने पवार यांना भाषण आवरते घ्यावे लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम