देवळा ; ब्रेन ट्रेन एज्युकेशन फौंडेशन नाशिकच्या वतीने येथील देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुलचे कला शिक्षक भारत पवार यांची शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
देवळा येथील कला शिक्षक भारत पवार यांच्या फलकरेखा चित्राची नाशिकच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशन फौंडेशन संस्थेने दखल घेऊन त्यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार घोषित केला आहे . हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दि १८ रोजी नाशिक येथे पार पडणार असून, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री जयकुमार रावल ,मविप्र चे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे, धुळे जि प च्या उपाध्यक्ष कुसुमताई निकम आदी उपस्थित राहणार आहेत.
भारत पवार यांच्या निवडीचे प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ मालती आहेर आदींसह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. या आधी भारत पवार यांना विविध संस्थांकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम