बीड : येथील श्रीक्षेत्र भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या मेळाव्यानंतर अतिउत्साही कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला आहे. या गोंधळानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर जोरदार लाठीचार्ज केला आहे.
बीड येथील भगवानगडावर दरवर्षी मुंडे परिवाराचा राजकीय मेळावा पार पडतो. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा ह्या इथे मेळावा घेत असतात. यंदाच्या या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. खासदार प्रितम मुंडे यांनी सुरुवातीला भागवानबाबांची शांततेची शिकवण असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण काही उत्साही कार्यकर्ते शांत राहण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पंकजा मुंडे या भाषणासाठी ज्यावेळी मंचावर दाखल झाल्या, तिथपासून ते भाषण संपेपर्यंत काही हुल्लडबाज तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पंकजा यांनी मंचावरून या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले, तेव्हा हा गोंधळ काहीकाळ थांबला.
पण मुंडें या आपले भाषण संपवून आपल्या ताफ्याकडे गेल्या, त्यानंतर काही कार्यकर्त्यांची गर्दी ही मंचाच्या दिशेने जाऊ लागली. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचे आवाहन पोलीस करत होते. पण प्रचंड गर्दीमुळे कोणीही तिकडून हटले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर ही गर्दी पांगली. जवळपास आठ ते दहा मिनिटे हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर काही वेळाने आणखी पोलीस फौज तिथे बोलवावी लागली. त्यानंतर पंकजा मुंडे यांची गाडी रवाना करण्यात आली.
पक्षाने तिकीट दिले, तर, मी २०२४ ची निवडणूक लढणार
यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षावरील नाराजीवर त्यांनी मौन सोडत म्हणाल्या, जर मला पक्षाने तिकीट दिले. ते मी २०२४ ची निवडणूक लढणार. आता मी २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले असून तुम्हीही आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, असे कार्यकर्त्यांना सूचित केले आहे.
तसेच मोदींवरील वक्तव्यावरून बोलताना त्यांनी मी गोपीनाथ मुंडेचा वारसा चालवत नाही. तर मुंडें साहेबांनी ज्या पंडित दीनदयाळ उपध्याय यांचा वारसा चालवला, अटल बिहारी वाजपेयी यांचा वारसा चालवला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसा चालवते, तोच वारसा मी पुढे चालवते. त्यामुळे मी शत्रूबद्दल कधी वाईट बोलत नाही तर ज्यांचा वारसा मी चालवते त्यांच्या विरोधात कशी बोलेल, असे म्हणत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम