द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. B.A.4 व B.A.5 या दोन व्हेरियंटनी आता महाराष्ट्रात शिरकाव केला असल्याने चिंतेमध्ये अधिक भर पडली आहे. पुण्यामध्ये या दोन्ही व्हेरियंट्सचे पाहता एकूण सात रुग्ण सापडले आहेत.
B.A.4 व B.A.5 या नव्या कोरोना व्हेरियंटने सध्या जगाला पुन्हा एकदा काळजीत टाकले आहे. महाराष्ट्रात हा व्हेरियंटचे रुग्ण पुण्यामध्ये आढळले आहेत. पुण्यात एकंदर चार रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी B.A.4 व्हेरियंटचे ४ रुग्ण तर B.A.5 व्हेरियंटचे ३ रुग्ण आढळले आहेत. जिनोम सिक्वेंसिंग या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासामध्ये ५२९ नविन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट ९८.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आज कोरोना रुग्णाचा एकही मृत्यू झालेला नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम