Baramati | काही दिवसांपूर्वी बारामतीत एका भाषणादरम्यान अजित पवारांनी “माझ्या कुटुंबात मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नये”, अशी भावनिक साद घातली होती. दरम्यान, दादांच्या या भावनिक सादेला बारामतीकरांनी प्रतिसाद दिला असून, बारामती तालुक्यातील अजित पवारांचे मूळ गांव असलेल्या काटेवाडीतील काही घरांवर “दादा वहिनी हे तुमचं कुटुंब, आणि आम्हीच इथले उमेदवार” अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या.
आधी अजित पवारांच्या सख्ख्या भावाने, वाहिनीने आणि नंतर पुतण्यानेही अजित दादांच्या विरोधातील भूमिका घेतली असून, अजित पवारांचं कुटुंब वगळता संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहे. त्यामुळे काटेवाडी येथील काही घरांबाहेर असे फलक लावलेले आहेत.(Baramati)
Breaking News | आमदार रोहित पवारांनाही ईडीकडून समन्स
Baramati | गावकऱ्यांचे म्हणणे काय..?
“आम्ही जे घराबाहेर ‘दादा वहिनी हे तुमचं कुटुंब आणि आम्हीच इथले उमेदवार’, असे हे बोर्ड लावले आहेत. या मागचं कारण की दादांनी या गावाचा विकास केलेला आहे आणि आता दादांनाच असं एकटं पाडलं जात आहे. अजित दादा हे एकटे पडले असून, बाकी सर्व कुटुंब हे त्यांच्या विरोधात आहे. तर हे चुकीचं ठरवण्यासाठी आणि दादांना साथ देण्यासाठी आम्ही काटेवाडीकर आणि बारामतीकर, आम्ही तुमच्या कुटुंबातील आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. हे दादांना सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आम्ही आमच्या घराबाहेर असे बोर्ड लावले असल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले आहेत. (Baramati)
Ajit Pawar | शरद पवारांची राजकीय गुगली; अजित दादा एकटे पडले
सुनेत्रा पवार यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला होता..
तसेच यावेळी गावकऱ्यांनी एल आठवण सांगितली की,”सुनेत्रा पवार या २००८ साली आमच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत काम करत असताना त्यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला होता की, येथील घरातील महिलांचे नाव हे घरावर असावं. आणि हाच निर्णय आता राज्य शासनानेही घेतला आहे. मुलांच्या नावापुढे आईचे नाव असावे आणि नंतर वडिलांचे नाव व आडनाव हा निर्णय २००८ मध्येच काटेवाडीच्या ग्रामसभेत सुनेत्रा वहिनींनी घेतला होता आणि कुटुंबात दादावहिनी हे एकटे नाहीत. आम्ही संपूर्ण गाव हे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.(Baramati)
सध्या बारामतीमध्ये ननंद विरुद्ध भावजाय अशी जोरदार लढत सुरू असून, या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. संपूर्ण पवार कुटुंब विरोधात असताना, पवारांचे मूळ गाव असलेले काटेवाडी गाव मात्र अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. (Baramati)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम