Baramati Lok Sabha | बारामती शरद पवारांचीच; दादा पत्नीलाही निवडणून आणण्यात अपयशी

0
44
Baramati Lok Sabha
Baramati Lok Sabha

Baramati Lok Sabha |  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात चौथ्यांदा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. येथे नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होती. स्वतः शरद पवार लेकीसाठी मैदानात उतरले होते. लेकीसाठी त्यांनी आपल्या कट्टर विरोधकाचीही भेट घेत मदत घेतली होती. तर, अजित पवरांनीही आपली पूर्ण ताकद पणाला लावत ही जागा लढवली होती. अजित पवारांच्या (ajit pawar) पत्नी सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांचा पराभव झाला असून, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींचीही सभा झाली होती. (Baramati Lok Sabha)

Nashik Lok Sabha Result | नाशिकमध्ये परिवर्तनाचे वारे फिरले; गुलाल राजाभाऊ वाजेंचाच

केंद्रात ताई आणि राज्यात दादा हेच समीकरण कायम 

मात्र, तरीही या लढतीत सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला असून, पहिल्या फेरीत आघाडीवर असलेल्या सुनेत्रा पवार या नंतर पिछाडीवर पडल्या आणि संसदमहारत्न असलेल्या सुप्रिया सुळे (supriya sule) यांचा विजय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीत केंद्रात ताई आणि राज्यात दादा हे समीकरण ठरलेले होते. या दोन्ही कुटुंबांनी जरी समीकरण बदलू पाहिले.

BJP Goverment | ४०० पार सोडा, आता सत्तास्थापनेसाठीही दुसऱ्यांचे पाय धरावे लागणार..?

Baramati Lok Sabha | गड राखण्यात शरद पवारांना यश

तरी, बारामतीच्या मतदारांनी मात्र हेच समीकरण कायम ठेवत सुप्रिया सुळे यांनाच दिल्लीत पाठवले आहे. ही लढत प्रतिष्ठेची लढत असल्याने अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा आणि ताकद येथे पणाला लागली होती. दरम्यान, हा गड राखण्यात शरद पवारांना यश आले असून, सुप्रिया सुळे चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत. (Baramati Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here