देवळा – उमराने येथे जाणता राजा मित्रमंडळाचा ‘वटवृक्ष लागवड उपक्रम’

0
25

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (देवळा) – हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा शुरवीर योद्धा माणकोजी दहातोंडे यांच्या स्मरणार्थ उमराणे येथे जाणता राजा मित्र मंडळा तर्फे “वट वृक्ष लागवड” कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

उमराणे मावळखो-यात जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. त्यातीलच महाराणी सईबाई भोसले वटवृक्ष लागवड उपक्रम २०१८ साला पासून राबविला जात आहे. हिंदवी स्वराज्यासाठी अनेक सरदार किल्लेदार व मावळ्यांनी योगदान दिले आहे. मंडळाच्या वतीने शुर योद्धयांच्या पराक्रमाचे स्मरण व्हावे व तरुणांना प्रेरणा मिळावी हा उद्देश ध्यानात घेऊन गेल्या २८ वर्षांपासून उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी शुरवीर योद्धा माणकोजी दहातोंडे यांच्या स्मरणार्थ उमराणे वतनातील परसूल नदीच्या तीरावरील स्व. निवृत्ती काका आठवडे बाजार आवारात वन अधिकारी माणिक साळुखे यांच्या हस्ते वटवृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन

कृ.उ.बा.स. सभापती प्रशांत देवरे, मा.सभापती विलास देवरे, प.स.उपसभापती धर्मा देवरे, मुख्याध्यापक श्रीप्रकाश पाटील, वन सेवक रमेश साळुखे, चेअरमन संदीप देवरे, भगवान देवरे, सुभाष गायकवाड, अरुण सोनवणे, बाळू देवरे, रवींद्र देवरे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ यांनी जाणता राजा मंडळाच्या कार्याचा गौरव केला. आजपावेतो राबविलेल्या समाजउपयोगी कार्यामुळे ३५०-४०० वर्षानंतर आजही शिवरायांचे कार्य व त्यांचे सरदार, मावळे यांचा पराक्रमाचा वारसा मंडळाने अखंडपणे सुरु ठेवला आहे. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी सदर उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, प्रवीण देवरे, तात्या देवरे, योगेश देवरे, रामराव देवरे, अनंत देवरे, बाळा पवार, दिनेश देवरे, शांताराम देवरे, अनिल देवरे, भाऊसाहेब पाटील, महेश पवार, गोरख देवरे, तात्या गायकवाड, भारत देवरे, आबा देवरे, डॉ.प्रवीण देवरे, जयेश देवरे आदींसह  ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here