
देवळा ; तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या भऊर शाखेतील काही कर्मचारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक आपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने सदर घटनेची तात्काळ सखोल चौकशी करण्याची मागणी आ.डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाधारण डी यांची (१३) रोजी भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की , देवळा तालुक्यातील भऊर येथे बँक ऑफ महाराष्ट्र ह्या बँकेची शाखा असून ,सदर बँकेत परिसरातील भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, वरवंडी, बगडू आदी गावातील शेतकऱ्यांचे खाते आहेत. सदर बँकेतील कर्मचारी यांच्याकडून शेतकऱ्यांनी भरणा करण्यासाठी दिलेले पैसे खोट्या पावत्या देवून खात्यात जमा केले असल्याचे भासवून प्रत्यक्षपणे पैसे खात्यात भरले नसल्याची बाब त्याचप्रमाणे बँकेतील पिक विम्याचे पैसे व मुदत ठेवीचे पैसे सदर कर्मचारी हे परस्पर काढत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी केल्यानंतर जवळपास २ कोटी रुपयाच्या पुढे अपहार झाल्याचे निवेदनात म्हंटले असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आर्थिक अपहारात सहभागी असलेल्या कर्मचारी तसेच झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनात आ.डॉ.राहुल आहेर यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम