कांद्याने रडवलंच! इजिप्तकडून कांदा निर्यातीवर बंदी; स्थानिक बाजारपेठेत कांदा महागणार

0
55

Nashik | इजिप्तने कांद्याला पुढील तीन महिन्यांसाठी निर्यातबंदी केली असल्याने अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारचा कांदा आयात करण्याचा एक दरवाजा बंद झालेला आहे. स्थानिक बाजारपेठेत उन्हाळ कांदा संपुष्टात आल्याने आणि यंदा कांद्याचे उत्पादन घटल्याने कांदादराने उसळी घेतलेली आहे.

OBC Sabha | जालन्यात आज ओबीसींचा एल्गार; या आहेत मागण्या

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे ग्राहककेंद्री राजकारण करण्यासाठी सरकारच्या हाती जास्तीच्या कांद्याची आवश्यकता आहे. पण बाजारातील कांद्याची तूट ही मागणी आणि पुरवठ्यातील अंतर वाढवत असल्याने दिवाळीनंतरदेखील कांद्याचे दर टिकून आहेत. दुसरीकडे स्थानिक बाजारातील कांद्याचे दर आवाक्यात राहण्यासाठी केंद्राने लागू केलेले निर्यातमूल्य डिसेंबरअखेरपर्यंत राहणार आहे. दरम्यान, इजिप्तच्या कांद्याबाबत संभ्रमित करणारी माहिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केली जाते आहे. त्यामुळे याबाबतच्या बातमीची खातरजमा करून घेण्याचं आवाहन राज्य कांदा उत्पादक संघटनेने केलेले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत संपुष्टात आलेल्या उन्हाळ कांद्यासह नव्याने येणाऱ्या लाल कांद्याला मिळणारा दर स्थिर राहणार आहे, असे व्यापारीवर्गाचे मत आहे.

केंद्राचा एक पर्याय बंद होणार

भारताने या अगोदर सन 2019-20 सालात इजिप्तकडून कांद्याची आयात केलेली होती. सद्यस्थितीत आता 3 महिन्यांसाठी इजिप्तकडून कांदा निर्यात होणार नसल्याने केंद्राचा एक पर्याय बंद होणार आहेत. दुसरीकडे भारत-पाकिस्तानच्या पारंपरिक तणावपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानमधुनही कांदा आयात होण्याची शक्यता नाही. या अगोदरही काही वर्षांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने वेळोवेळी इजिप्तसह आखाती देशांमधून कांद्याची आयात करून स्थानिक बाजारपेठेत दर नियंत्रित केलेले होते.

धक्कादायक! औषधातून पत्नीला दिले ब्लेडचे तुकडे

तेजी टिकण्याची चिन्हे

कांद्याचे दरनियंत्रणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या रोषालादेखील सरकारला सामोरे जावे लागले होते. मुंबईसह ठाणे, कल्याण या भागात ‘नाफेड’च्या माध्यमातून कांदा बाजाराच्या तुलनेने कमी दरात देण्यास सरकारने सुरुवात केलेली असली तरी साठा संपेपर्यंतच हे सरकारला शक्य होणार आहेत. यंदा कांद्याचे सर्वत्र घटलेले उत्पादन आणि साठवणूक केलेला कांदा संपुष्टात आल्याची स्थिती या कारणांमुळे पुढील महिन्यातदेखील कांदादरातील तेजी टिकून राहण्याची शक्यता व्यक्त होते आहे. गेल्या वर्षभरात कांदा उत्पादकांना मात्र आयात-निर्यात धोरणे, आस्मानी संकटं आणि बाजारातील सातत्याने बदलणारी परिस्थिती या सर्व गोष्टींचस्फटका बसला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here