
देवळा : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवळा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी देवळा तालुकाप्रमुख बापू जाधव यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे याच्या प्रतिमेचेपूजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांनी विषमता नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

महाराष्ट्रतील सामाजिक व आर्थिक लोकशाही जसजसी यशस्वी व सामर्थ्यशाली होत जाईल तसतशी ठाकरेची ऐतिहासिक मूर्ती अधिकाधिक तेजस्वी दिसत जाईल. जनता आपल्या अपार प्रेमाने अखंड कृतज्ञतेने त्यांचे स्मरण करीत राहील यात शंका नाही. अर्थात बाळासाहेबाचे नाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी झटणारे धुरंधर पुरोगामी व दूरगामी विचारांचे बाळासाहेब ठाकरेचे सामाजिक कार्याचे सातत्याने स्मरण ठेवून त्यांचे वैचारिक विचारांचा वसा व वारसा जिद्दीने व चिकाटीने घेवून सामाजिक विकासाची प्रामाणिकपणे व निष्ठेने वाटचाल करुन सामाजिक मूल्ये रुजवण्यात त्यांचे विचार निश्चितच मार्गदर्शक ठरतील असे मार्गदर्शन केले. तसेच देवळा ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा संघटक, नंदू जाधव, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ ,तालुका संघटक प्रशांत शेवाळे, उपतालुका प्रमुख विलास शिंदे, वसंत सुर्यवंशी, उपतालुका संघटक विजय आहेर, शहर संघटक देवा चव्हाण ,ऊपशहर प्रमुख, सतिष आहेर, जितेन्द्र भामरे, सोमनाथ शिंदे, समाधान शिंदे, खंडू जाधव, गट प्रमुख, गोरख गांगुर्डे, गण प्रमुख सुनील निकम आदींसह ज्ञानेश्वर देवरे, भाऊसाहेब आहेर, संदिप आहेर, आकाश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम