Nashik News | बागलाणचे अर्ली द्राक्ष दुबई-रशियाला रवाना; दीवाळीचा मुहुर्त

0
40

Nashik News | नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी बागलाण तालुक्यातील अर्ली द्राक्ष दुबई आणि रशियाला निर्यात झालेले आहेत. शेतकऱ्यांनी दिवाळीचा मुहूर्त साधत निर्यातीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 44 हजार 600 शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवलेले आहेत. जिल्ह्यातून युरोपीयन समूहातील 21 देशांसह रशिया, दुबई, चीन, मलेशिया, श्रीलंका या देशांना द्राक्षाची निर्यात होते. कोरोनामुळे दोन वर्षे ही द्राक्ष निर्यात बंद होती. परंतु, यंदा जानेवारीतच निर्यातीला सुरवात झालेली आहे.

Nashik | वायू प्रदूषणाबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसची शहरात जनजागृती

सुरुवातीच्या काही दिवसांत 200 टन द्राक्षांची नेदरलँड, लॅटव्हिया आणि स्वीडनला निर्यात झालेली आहे. बागलाण तालुक्यातील अर्ली द्राक्षांच्या निर्यातीला आता सुरुवात झालेली आहे. रशियासह दुबईला हे द्राक्ष पाठवलेले आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यातून दोन लाख टन द्राक्षांची निर्यात झालेली होती. यंदा युरोपीय देशांची मागणी लक्षात घेता सव्वालाख ते दीड लाख टन द्राक्ष निर्यात होण्याची अपेक्षा आहे.

Nashik news | नाशिकमधील ८ तालुके, दुष्काळसदृश्य जाहीर अशा आहेत सवलती

‘अपेडा’ च्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी 

‘अपेडा’च्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्यात येते आहे. गेल्या वर्षी 31 हजार 811 शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी केलेली होती. कृषी विभागाला 2023-24 या वर्षामध्ये 44 हजार 600 बागांच्या नोंदणीचा लक्षांक देण्यात आलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केलेले आहे. निर्यातक्षम फळे आणि भाजीपाला नोंदणी कशी करावी याविषयी कृषी उपसंचालक जगदीश पाटील, कृषी अधिकारी लितेश येळवे यांनी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here