Accident : त्या अपघातात जखमी आठ महिन्याच्या बाळाचा अखेर मृत्यू…

0
25

Accident : भंडारा जिल्ह्यात असलेल्या रामटेक येथे देवदर्शन करून परतत असताना एका कुटुंबाला महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकने धडक दिली, यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर मृतांमध्ये 8 महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही, यात भंडारा जिल्ह्यातील अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रामटेक-भंडारा रोडवरील खंडाळा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून यात आठ महिन्यांच्या बाळाचा सुद्धा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील हे प्रवासी देवदर्शनासाठी रामटेकला गेले होते. त्यावेळी घराकडे परतत असतांना खंडाळा गावाजवळ चालकाच कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत कारमधील एकाच जागीच मृत्यू झाला असून आठ ते दहा जण जखमी झाले होते यातील जखमींमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश होता, उपचारादरम्यान आठ महिन्याचे बाळ आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला आहे.इतर जखमींना पुढील उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या एका बाजूचा पूर्ण चक्काचूर झालाय.

दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच आरोली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी धोकादायक पद्धतीने रस्त्यावर उभ्या असलेल्या संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

परसराम लहानू भेंडारकर वय ७० असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जखमींमध्ये राजेश परसराम भेंडारकर वय 34 वर्षे, दुर्गा राजेश भेंडारकर वय 32 वर्षे, मेघा चद्रहास बोंदरे वय 31 वर्षे, परसराम लहानू भेंडारकर वय 70 वर्षे, सीताबाई परसराम भेंडारकर वय 64 वर्षे, हिमांशू राजेश भेंडारकर वय 8 महिने, उन्‍नती राजेश भेंडारकर वय 8 महिने, रा. वय 5 वर्षे, भार्गवी चद्रहास बोंदरे वय 08 वर्षे, भव्य चद्रहास बोंदरे वय 08 वर्षे हे सर्वजण सोनकापाळस गाव, तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहेत.

ट्रक क्रमांक एमएच 40 सीडी 9802 च्या चालकाविरुद्ध कलम 283,337,338,304 (अ) भादवी सह कलम 122/177 मोवोका नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here