देवळा ; समाज जर पुठे गेला तरच आपले भले होणार आहे. कारण कित्येक वर्षानुवर्षे आपण मागासलेले म्हणून गणले गेलो आपल्यायाला कोणी जवळ करत नव्हतं परंतु या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहे आंबेडकर या दोनच व्यक्ती अशा होऊन गेल्या कि त्यांनी आपल्याया जवळ केले आहे. असे प्रतिपादन माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आज येथे केले .
देवळा येथे आज दि ३० रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता . यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रेशमा वाघचौरे , भारती शिलावट , संगीता वाजगे ,सुरेखाताई घोलप , अनिता काळे , शिवसेनेचे सुनील पवार ,बापू जाधव आदी उपस्थित होते . यावेळी माजी मंत्री घोलप पुढे म्हणाले कि , मी मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे समाज कल्याण व इतर खात्याचा कारभार आला .परंतु समाजाची एकजूट नसल्याने मी नाराज झालो. तरी देखील समाजासाठी विविध योजना अमलात आणून त्यांचे जीवनमान सुधारण्याचे प्रयन्त केले.
दलित वस्ती सुधार योजेतर्गत सुधारणा झाली . समाज उघडयावर बसला होता . त्याची छत्री फाटलेली होती . समाज कल्याण विभागामार्फत जवळपास दीड लाख चर्मकार बांधवाना टपऱ्या देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला . समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नशील असून ,यासाठी सर्वांची एकजूट असणे गरजेजेचे आहे. आश्रम शाळेच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. पहिली ते दहावी पर्यंत एक रुपयाही खर्च येत नाही. यासाठी महिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे. संत रोहिदास , छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहे आंबेडकर या महान विभूतींचे विचार समाजाने कधी विसरता कामा नये. कार्याध्यक्ष भानुदास वसावे ,संपर्क प्रमुख आनंदा महाले यांनीहि आपले मनोगत व्यक्त केले . उपसस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास दत्तात्रय गोतिसे ,अनिल कानडे ,दिलीप गोविंद ,प्रमोद नाथेकर ,राजाभाऊ आहेर ,मनोज म्हैसधुणे ,सुरेश अहिरे ,उल्हास गुजरे , डॉ कृष्णा अहिरे , काशिनाथ आहिरे आदींसह चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . मेळा यशस्वीतेसाठी ग्रामीण जिल्हाप्रमुख भास्कर आहिरे ,संपर्क प्रमुख मधुकर आहिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभार तालुका अध्यक्ष शिवाजी आहिरे यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम