भऊर येथील जवान अविनाश पवार यांच्या कुटूंबाला सुराणा पतसंस्थेच्या वतीने आर्थिक मदत

0
33

देवळा ; भऊर ता .देवळा येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अविनाश केवळ पवार (वय ३१) यांचे आजारावर उपचार सुरू असताना शुक्रवार (दि.९) रोजी निधन झाले. या कुटुंबातील सदस्यांची येथील सुराणा पतसंस्थेचे चेअरमन डॉ रमणलाल सुराणा व संचालकांनी भेट घेऊन सांत्वन केले व संस्थेच्या वतीने या कुटुंबाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली .

भऊर ता .देवळा येथील भारतीय सैन्यदलातील जवान कै अविनाश केवळ पवार यांच्या पत्नी तेजस्विनी पवार यांना आर्थिक मदतीचा धनादेश देतांना सुराणा पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा, व्हा चेअरमन डॉ जगदिश धामणे ,अशोक सुराणा,प्रदीप सुराणा ,संजय कानडे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

अविनाश यांनी २०११ मध्ये २६ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन मध्ये भरती होत सैनिकी सेवेचा प्रारंभ केला. सध्या त्यांची पोस्टींग जम्मू येथे असतानाच तब्येतीत बिघाड झाला. जबलपूर येथील कमान हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यात आल्यानंतर बरे वाटल्याने एका महिन्याच्या सुटीवर ते घरी आले. या दरम्यान पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने भऊर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देवळा येथील सुराणा पतसंस्थेच्या वतीने सोमवारी(दि१२)रोजी त्यांच्या कुटुंबियांना संस्थेने रु.२५०००/- ची आर्थिक मदत केली आहे . संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे . यावेळी अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा, व्हा चेअरमन डॉ जगदिश धामणे, संचालक प्रदीप सुराणा, अशोक सुराणा , संजय कानडे , जनार्दन शिवदे आदी उपस्थित होते .

देवळा येथील सुराणा पतसंस्था जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत आहे . अशा प्रकारे आर्थिक मदत करणारी जिल्हयातील एकमेव संस्था आहे . संस्थेने हा उपक्रम सुरू केल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील शहीद झालेल्या बारा जवानांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे . कुटूंबाची पर्वा न करता जिल्ह्यातील अनेक तरुण देश सेवा करीत आहे . त्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपत आहोत . सेवा काळात अशा घटना झाल्यावर कुटुंब उघड्यावर पडते . त्या कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून सुराणा पतसंस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे .
डॉ रमणलाल सुराणा , अध्यक्ष सुराणा पतसंस्था, देवळा

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here