देवळा ; भाजपच्या देवळा तालुका अध्यक्षपदी येथील अतुल (मम्या) पवार यांची नियुक्ती करण्यात आली . रविवारी दि १७ रोजी नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत . त्यात भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .तर आज मंगळवारी दि १९ रोजी देवळा येथील नगरपंच्यातीचे माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांची देवळा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .
अतुल पवार हे केदा आहेर यांचे खंदे समर्थक असून , ते सुभाषरोड गणेश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत .सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्राबरोबर च ,युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून अशी सम्पूर्ण तालुक्यात ओळख असणाऱ्या अतुल पवार यांनी जिल्हा नेते केदा आहेर ,आमदार डॉ राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या माध्यमातून शहर तसेच तालुक्यात विकास कामांच्या जोरावर आपला ठसा उमटवला आहे .
पवार यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री पवार ह्या देवळा नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका आहेत .
त्यांच्या नियुक्तीचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार ,आ.डॉ.राहुल आहेर, भाजपा नेते केदा आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, भास्कर पवार, हर्षद मोरे,माजी तालुका अध्यक्ष सुनिल देवरे,भाऊसाहेब आहेर,संजय कानडे हर्षद भामरे ,सोपान सोनवणे, शंकर निकम, मनेश ब्राह्मणकार, दिपक जाधव, दिनेश मोरे, विजय आहेर, पवन अहिरराव, उप सरपंच जगदिश शिंदे, भिला आहेर, सुनिल सावंत, दिलिप जोंधळे आदींनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम