बॉलीवूड इंडस्ट्रीज नुकताच लग्न सोहळा पार पडला आहे तर एकामागोमाग एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. आता एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया लवकरच क्रिकेटर केएल राहूल सोबत लग्नबंधनात पडणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटर केएल राहूल सोबत असलेल्या रीलेशनशीपच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. अथिया आणि केल राहुलला नेहमीच अनेक कार्यक्रमात एकत्र पाहिलं जातं. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची बातमी मीडियानं व्हायरल आहे. इंस्टाग्राम वर अथिया आणि केएल राहून एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतात. दोघे यावर्षी लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.
आता तर केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची जोरदार चर्चेला उधाण आले. पिंकव्हिला या इंग्रजी वेबसाइटला मिळालेल्या माहितीनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुल आपल्या नात्याला पुढे नेण्याचा विचार करीत आहेत. हे वेबसाइटनं दिलेल्या बातमीनुसार क्रिकेटर आणि अभिनत्री दोघे दाक्षिणात्य परंपरेनुसार लग्नबंधनात करणार आहेत.
के एल राहूलचा वाढदिवसा निमित्ताने अथियाने के एल राहूलबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत कमेंटस करत प्रेमाची कबुली दिली आहे. यानंतर त्याच्या लग्नाची माहिती समोर येत आहे.शेट्टी कुटुंबाच्या हालचालीवरून कळत आहे की, आता केएल राहुल आणि अथियाचं कुटुंब लग्नाच्या सोहळ्याकरता उत्सुक असुन तयारीला लागले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम