दुबई – दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकातील हाय-वोल्टेज सामन्यात श्रीलंकाने बांगलादेशवर दोन गडी राखत सुपर ४ फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात ‘करो अथवा मरो’ची स्थिती होती. दोन्ही संघाला याआधी पराभव पत्करावा लागल्यानंतर ही लढत दोघांसाठी महत्वाची होती. अखेर श्रीलंकेने ह्यात विजय मिळवत मागच्या आशिया चषकाचा पराभवाचा वचपा काढला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला बांगलादेशने डावाची सुरुवात करताना मेहंदी हसन आणि शकीब अल हसनने चांगली सुरुवात केली. लंकेच्या फिरकीपटूनी दोघांचा बळी घेतला, त्यानंतर अफीफ हुसेनने बांगलादेशचा डाव सावरत धावसंख्या २० षटकात ७ गडी गमावून १८३ धावापर्यंत पोहोचला.
प्रत्युतरात श्रीलंकेची सुरुवात चांगली केली, मात्र त्यांनतर लंकेचा डाव अडखळयानंतर काही षटकातच लंकेने जोरदार कमबॅक केला. शेवटच्या षटकात ८ धावांची गरज असताना असिथा फर्नान्डोने चौकार करत विजयावर शिक्कामोर्तब केला. श्रीलंकेकडून कुशल मेंडीसने अर्धशतक ठोकले. तसेच गोलंदाजीतही हसरांगा आणि चामिका करुणारत्ने चमकले.
यासोबतच श्रीलंका सुपर ४ फेरीत दिमाखात प्रवेश केला. याआधी २०१८ मध्ये झालेल्या आशिया चषकात श्रीलंका साखळी फेरीतून बाहेर पडली होती. सुपर ४ फेरीत श्रीलंकेसोबत भारत, अफगाणिस्तान पात्र झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम