आशिया चषकात पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला !

0
36

दुबई – आशिया चषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने जबरदस्त प्रदर्शन करत हाँगकाँगला १५५ धावांनी हरवले. विजयात शादाब खान आणि मोहम्मद रिझवान यांचा मोलाचा वाटा राहिला. या विजयासह पाकिस्तानने सुपर ४ फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे.

हाँगकाँगने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र हाच निर्णय हाँगकाँगच्या अंगलट आला. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि फाखर झमानने तुफान खेळी करत संघाला २० षटकात २ बाद १९३ धावा केल्या. हाँगकाँगकडून इशान खानने स्टार फलंदाज बाबर अझामच्या विकेटसह २ गडी घेतल्या.

प्रत्युत्तरात १९४ धावांचे लक्ष्य घेऊन उतरताना हाँगकाँगचा संघ अक्षरशः पत्त्याप्रमाणे कोसळला. हाँगकाँगचा डाव अवघ्या १०.४ षटकात सर्वबाद ३८ धावातच आटोपला. विशेष म्हणजे, हाँगकाँगच्या कुठल्याही खेळाडूला दोन अंकी धावसंख्या गाठता आला नाही. पाकिस्तानकडून शादाब खानने ४ तर मोहम्मद नवाझने ३ गडी घेतल्या.

दरम्यान, पाकिस्तानच्या विजयामुळे सुपर ४ फेरीतील संघ निश्चित झाले आहे. सुपर ४ फेरीत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान व श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. येत्या रविवारी (दि. ४) हा महामुकाबला दुबईच्या मैदानात रंगणार असून चाहत्यांना पुन्हा एकदा ही पर्वणी पाहायला मिळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here