Ashok Chavhan | अशोकरावांना कुठल्याही पदाचा मोह नाही; पक्षप्रवेशानंतर कोण काय म्हणाले..?

0
44
Ashok Chavhan
Ashok Chavhan

Ashok Chavhan |  काल काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षातील त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज अखेर त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडला.(Ashok Chavhan)

अशोकरावांना कुठल्याही पदाचा मोह नाही

यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”ज्यावेळी आमचे आणि अशोक चव्हाण यांचे बोले झाले होते, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी अनेक मोठमोठी पदं भूषवली असून, मला कुठल्याही पदाचा मोह नाही. मला केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या विकासाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी द्या. इतकीच इच्छा त्यांनी व्यक्त केली.(Ashok Chavhan)

Congress | इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचाही काँग्रेसला रामराम..?

त्यांच्या येण्याने पक्षाला बळकटी येईल

तसेच ते म्हणाले की,”अनेक पक्षांच्या या कार्यकर्त्यांची देशाच्या मुख्य विकासाच्या प्रवाहात येण्याची इच्छा आहे. तेही येणाऱ्या काळात पक्षात प्रवेश करतील. भविष्यात अशोक चव्हाणांच्या प्रभावाखाली काम करण्याची इच्छा असणारे अनेक कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या येण्याने राज्यात आणि विशेषतः विदर्भात पक्षाला बळकटी येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Ashok Chavhan)

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिकमध्ये; असा असेल ‘नशिक दौरा’..?

Ashok Chavhan | अशोक चव्हाण म्हणाले “कॉंग्रेस…” 

दरम्यान, या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी आशिष शेलार यांचा “मुंबई काँग्रेसचे नेते..” असा उल्लेख केला आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. यावेळी त्यांनी बाजू सावरताना म्हटले की,”ही ५० वर्षांची सवय आयहे. भाजप कार्यालयात ही पहिलीच परिषद आहे. सवय व्हायला वेळ लागेल. कालच राजीनामा दिल्याने लगेच ‘स्वीच’ व्हायला वेळ लागेल, समजून घ्या, अशी त्यांनी बाजू सावरून नेली. (Ashok Chavhan)

तसेच, “माझा ३८ वर्षांचा हा राजकीय प्रवास असून, माझ्या आयुष्याची आज नवीन सुरुवात मी करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे ही एकच भावना आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रमाणिकपणे काम केलेलं आहे आणि इथेही प्रामाणिक प्रयत्न करेल. आगामी निवडणुकांसाठी माझ्याकडून पक्षाला मदत होईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here