देवळा : देवळा तालुक्याची पहाट आज दुःखाने उजाडली असून तालुक्याने आज एक मोठे नेतृत्व गमावले आहे. पहाटेच्या सुमारास भाजपाचे नेते अशोक देवराम आहेर यांची तबीयत अचानक बिघडल्याने त्यांचे आकस्मित निधन झाले, त्यांना उपचारासाठी नाशिक नेत असताना पिंपळगांव बसवंत येथे त्यांची प्राण ज्योत मावळली असून त्यांच्या अकाली जाण्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अशोक बापू यांनी अनेक पद भूषवले असून देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष अशा अनेक पदाना त्यांनी योग्य न्याय देत तालुक्याच्या राजकारणात त्यांनी वेगळी छाप पाडली होती, सर्वसामान्यांचा नेता आज गमवल्याची भावना निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य जनतेला थेट अक्सेस बापुंकडे असल्याने आज सर्वमान्य नागरिकांनी टाहो फोडला आहे. देवळा तालुक्याची पहाट आज अतिशय दुर्दैवी उजाडली असून काळोख पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्व्यानी हळहळ व्यक्त केली आहे.
आज देवळा येथे वयाच्या 65 व्या वर्षी आपले प्राण गमावले आहे. दुपारी 3 वा. अमरधाम देवळा येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
देवळा येथील माजी सरपंच, देवळा पंचायत समितीचे माजी सभापती, देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष, तसेच देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व विद्यमान संचालक , एकता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक(बापू) देवराम आहेर ( 65) यांचे आज शनिवारी (दि२०) रोजी सकाळी आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे. देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा व माजी जि प सदस्या भारती आहेर यांचे पती ,तर प्रतीक आहेर यांचे ते वडील होत . अशोक आहेर यांच्या निधनाने सम्पूर्ण देवळा शहर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम