आर्यन खानचा पासपोर्ट परत करा, विशेष न्यायालयाचे एनसीबीला आदेश

0
8

मुंबई – आर्यन खानला त्याचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश आज विशेष न्यायालयाने एनसीबीला दिले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्यावर्षी क्रुझवरील ड्रग्स प्रकरणात अडकला होता.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यनला ताब्यात घेतले होते. या प्रकरणात क्लिनचिट मिळाल्यानंतर आर्यनने विशेष एनडीपीएस न्यायालयात पासपोर्ट परत करण्याचे आणि बाँड रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. आर्यन खान प्रकरणात विशेष न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे.

या प्रकरणी माहिती देताना आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या आरोपीवर कारवाई करण्याचे थांबवले जाते तेव्हा जो आदेश न्यायालयाकडून दिला जातो, त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. यावर विशेष न्यायाधीश यांनी देसाई यांना उलट प्रश्न केला. तो असा की, तुम्हाला आर्यन खानचा बेल बाँड आणि पासपोर्ट पुन्हा हवा आहे का, त्यावर देसाई यांनी आम्हाला एनसीबीकडून उत्तर मिळाले आहे. त्यांना आता आरोपी आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळालेला नाही आणि त्याच्या विरोधात कुठलीही चौकशी होणार नाही.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here