द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आताच कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणा तुन क्लिनचिट मिळाली आहे. त्याच्याने कोणतेही ड्रग्ज आपल्यासोबत बाळगले नव्हते, असं स्पष्ट करत एनसीबीने आर्यन खान व ६ जणांना क्लिनचिट दिली आहे. परंतु दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करत असलेले माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत.
आर्यन खान याला क्लिनचिट मिळाल्यानंतर सध्या या प्रकरणाच्या तपासावरच सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपलाय. तरी, आर्यन खानला मिळालेल्या क्लिनचिटमुळे वानखेडेंनी या प्रकरणाचा केलेला तपासावरच मुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सरकारकडून समीर वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवत नोकरी मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच निष्काळजीपणाने केलेल्या तपासाबद्दलही सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीकरिता वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्याचेही बोलले जात होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम