Arvind kejriwal: केजरीवाल – ठाकरे युतीची नांदी? केजरीवाल म्हणाले….

0
20

Arvind kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी शुक्रवारी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhv thakrey) यांची त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेतली. केजरीवाल जेव्हा ‘मातोश्री’वर गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि राघव चड्ढाही होते.

केजरीवाल- भगवंत मान यांचा एकदिवसीय मुंबई दौरा, मातोश्रीवर २०२४च्या रणनीतीवर चर्चा?

उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेले असताना देखील त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रीघ ही महत्वाची असून त्यांचे महत्व अधोरेखित होताना दिसत आहे. ठाकरे यांनी देशातील भाजपा विरोधी नेत्यांची मोट बांधत नेतृत्व करण्याची हिम्मत दाखवली असून यात ठाकरेंना यश आल्यास भविष्यात ठाकरे भाजपाला महागात पडण्याची शक्यता अधिक आहे. सद्या महाराष्ट्रात दोन ठिकाणी पोटनिवडणुका सुरू असून त्या ठिकाणचे निकाल देखील राज्याच्या राजकारणातील भविष्याला दिशा देणारा ठरणारा आहे.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ठाकरे भविष्यातील सर्व निवडणुका जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी शिवसेनेसोबत (UBT) युतीच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्यावर सर्व कळेल असे सूचक वक्तव्य केल्याने भविष्यात नवीन समीकरणांची नांदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’

दोन्ही नेत्यांमधील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे
निवडणूक आयोगाने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाचे वाटप केल्याने या बैठकीला महत्त्व आले आहे. शिंदे यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये बंडखोरी करून ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे (MVA) सरकार पाडले होते. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मदतीने शिंदे मुख्यमंत्री झाले.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून प्रलंबित असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका लढवणार असल्याचे आपने म्हटले आहे. शिवसेनेने अनेक वर्षांपासून देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचे नेतृत्व केले आहे, तर अलीकडेच आप ने दिल्ली महानगरपालिकेवर ताबा मिळवला आहे. ठाकरे आणि केजरीवाल हे दोघेही भाजपचे कडवे टीकाकार आहेत.

दिल्लीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून आणि पंजाबमध्ये पूर्ण बहुमत मिळवल्यानंतर गुजरातमध्ये काही जागांवर निवडणूक जिंकल्यानंतर आम आदमी पक्ष राष्ट्रीय स्तराकडे वाटचाल करत आहे. गेल्या वर्षी एमसीडी निवडणुकीत ‘आप’चा विजय झाला तर भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. यामुळे भविष्यात राज्याच्या राजकारणात आप ठाकरे सोबत आल्यास त्याचा काय परिणाम होईल हे बघणे महत्वाचे आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here