सिरोंचा जिल्ह्यात चक्रीवादळसह अवकाळी पाऊसाचे आगमन

0
31

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आज मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे गडचिरोली सिरोंचा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळाचा वेग इतका होता की समोरचे काहीच दिसत नव्हते. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर झाडे कोसळली.

सिरोंचा तालुक्यात आज ४ वाजताच्या सुमारास अचानक चक्रीवादळ व अवकाळी पावसाचा आगमन झाला. चक्रीवादळाने मुख्यालयातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रामंजपूर येथील पेट्रोल पंपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकांना काही कळायच्या आतच चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केले. वादळात अनेक घरांवरचे छप्पर उडाले, रस्त्यावरील टिनाचे शेड उडाले, मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली. जवळपास २० ते ३० मिनिट चक्रीवादळ सुरू होते.

तालुका मुख्यालयसह आणखी बरेच गावात नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील केवळ सिरोंचा तालुक्यात याचा खूप मोठा फटका बसला आहे. चक्री वादळाने सिरोंचा तालुक्यातील बहुतांश गावात मोठे नुकसान झाले. राज्याचे हवामान खात्याने काल सोमवारीच वादळाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज सिरोंचाला सर्वाधिक फटका बसला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here