सैन्यदलातून निवृत्त होणाऱ्या सैनिकांचा निवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे निवृत्त झालेल्या सैनिकांप्रती ऋण ; डॉ तुषार शेवाळे.

0
29
सेवानिवृत्त सैनिक देविदास मोरे यांचा सपत्नीक सत्कार करतांना मविप्रचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे , संचालक डॉ विश्राम निकम ,पंडितराव निकम ,नानाजी मोरे आदी . ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; सैन्यदलातून निवृत्त होणाऱ्या सैनिकांची मिरवणूक काढण व गौरव करण्याचा उपक्रम गावातील, परिसरातील युवकांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळण्यासाठी निवृत्त झालेल्या सैनिकांविषयी ऋण व्यक्त होण्यासाठीचा विधायक उपक्रम असल्याचे प्रतिपादन सैनिक मित्र व मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी व्यक्त केले.

सेवानिवृत्त सैनिक देविदास मोरे यांचा सपत्नीक सत्कार करतांना मविप्रचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे , संचालक डॉ विश्राम निकम ,पंडितराव निकम ,नानाजी मोरे आदी . ( छाया -सोमनाथ जगताप )

खामखेडा ता देवळा येथील सैन्यदलातुन सेवानिवृत्त झालेला जवान देविदास मोरे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ . नितीन पवार,मविप्र संचालक डॉ . विश्राम निकम,योगेश आहेर,पंडितराव निकम,जिल्हा बँकेचे माजी संचालक धनंजय पवार,मालेगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष लोटन शेवाळे,प्रा बी बी गुंजाळ,कुबेर जाधव,रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील देवरे,एस टी भामरे,नानाजी मोरे,कासुबाई मोरे,माधुरी मोरे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

भारतीय सैन्यदलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात.अशा सैनिकांचा समाजाला अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा या हेतूने सेवानिवृत्त सैनिकांचा सेवापुर्तीचा कार्यक्रम प्रेरनादाई असल्याचे प्रतिपादन आ नितीन पवार यांनी यावेळी केले.

यावेळी ह.भ.प अविनाश महाजन,संजय भामरे,गणेश शेवाळे,डॉ विश्राम निकम ,माजी सैनिक लोटन शेवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मोरे कुटुंबियांच्या वतीने गावातील आजी माजी तसेच कार्यक्रम स्थळी उपस्थित सैनिकांचा सत्कार केला.

कार्यक्रमास संत ज्ञानदेव अध्यासन पुना विद्यापीठाचे प्रमुख दिलीप धोंडगे, देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, जि प सदस्या अमृता पवार, प्रणव पवार ,विजय पगार,सतिश बच्छाव ,रॉ कॉं पार्टीचे कळवन तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, गिरणा ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे संचालक स्वप्नील पाटील, रोटरी क्लबचे सद्ष्य कौतिक पवार, प्रीतेश ठक्कर, प्रा डी डी आहेर, प्रदीप आहेर ,दिलीप आहेर,बाजार समितीचे संचालक जगदिश पवार, प्रो डी के आहेर, फुला जाधव, नरेंद्र अहिरे, अरुण पवार, जगन्नाथ देवरे, अक्षय देवरे ,चिंतामण आहेर, रमेश शिरसाठ, मनोहर बुटे आदींसह ग्रामस्थ नातलग मोठ्या संखेने उपस्थित होते.

सेवानिवृत्त सैनिक देविदास मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा डॉ प्रकाश शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.संजय पाटील यांनी सूत्रसंचलन केले व खंडू मोरे यांनी आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here