Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात गस्तीवर असताना नदी ओलांडताना आलेल्या पुरात नायब सुभेदार कुलदीप सिंग आणि भारतीय लष्कराचा एक जवान वाहून गेला. पोशना नदीच्या प्रवाहात भारतीय लष्कराच्या दोन्ही जवानांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
Solapur Breking : सोलापुरात बिहारी तरुणाची हत्या 2 आरोपींना अटक 1 फरार
जम्मू-काश्मीरमधील दुर्गम पूंछ भागात क्षेत्रीय वर्चस्व गस्तीदरम्यान नदी ओलांडताना भारतीय लष्करातील नायब सुभेदार कुलदीप सिंग हे एका पुरात वाहून गेले. जम्मूमधील संरक्षण विभागाच्या पीआरओने दिलेल्या माहितीनुसार, पुंछमधील पोशाना नदीत दोन लष्करी जवान वाहून गेले आहेत. अचानक आलेल्या पुरात वाहून गेलेल्या भारतीय लष्कराच्या दोन जवानांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या दुर्दैवी घटनेत पूंछ जिल्ह्यातील पोशना नदीच्या फुगलेल्या नाल्यात भारतीय लष्कराच्या दोन्ही जवानांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सैनिक सुरनकोट भागातील पोशाना येथील डोग्रा नाला ओलांडत असताना मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ते वाहून गेले. जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर, पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप दोन्ही जवानांचा शोध लागलेला नाही. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतर पूरस्थिती असलेल्या सर्व नद्या आणि नाल्यांपासून पोलिसांनी जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम