Mumbai Breaking: एपीमसी मार्केट मधील घटना सीसीटिव्हीत कैद, चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला

0
41

Mumbai Breaking : चोरट्यांनी मार्केटमध्ये ठेवलेल्या कॅरेटमधून टोमॅटोची चोरी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Nashik Monsoon Update: गेल्यावर्षी गोदावरीला पूर यंदा मात्र अजूनही नाशिकला जोरदार पावसाची प्रतीक्षा

राज्यासह देशातील अनेक शहारांतल्या मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. परिणामी महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. टोमॅटोला सोन्याचा भाव आल्याने अनेकांनी जेवणात टोमॅटो खाणंच बंद केलं आहे. त्यातच आता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या टोमॅटोवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता महागड्या टोमॅटोची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai breaking: सेल्फिचा नाद जीवावर बेतला,महिला समुद्रात वाहून गेली..

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये काही व्यापाऱ्यांनी टोमॅटोचा मोठा साठा ठेवला होता. त्यावेळी चोरट्यांनी व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या टोमॅटोच्या साठ्याची रेकी करत चोरीचा प्लॅन आखला. त्यानंतर शुक्रवारी आणि रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आत शिरून टोमॅटोचे अनेक कॅरेट लंपास केले आहे.

मार्केट सुरू झाल्यानंतर टोमॅटोची चोरी झाल्याचं व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांना मोठा दक्का बसला. चोरट्यांनी मार्केटमधून अनेक कॅरेट चोरून नेल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट दिसून येत आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई येथील बाजार समितीत टोमॅटोचा दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत पोहचला आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने अनेक शेतकरी तसेच व्यापारी टोमॅटोचा साठा करत आहे. त्यातच आता नवी मुंबईतील मार्केटमधून टोमॅटोची चोरी करण्यात आल्याने मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेतला जात असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here