राज्याच्या राजकारणात धक्कादायक घटना घडत असून उद्धव ठाकरे यांना नेस्तनाबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे एकही खेळी सोडत नसल्याचे चिन्ह आहे. अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेच्या दोन्ही गटांत जोरदार घमासान सुरू आहे. दोन्ही गटांना नवे नाव व चिन्ह देण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यावर दबाव वाढला असून थेट यांनाच शिंदे गटात आणून त्यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी पूर्ण ताकद लावली आहे.
असे घडल्यास उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का असेल. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंचा हा प्लॅन राजकारणात खळबल उडवून देणारा आहे. लटके यांना शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीकडून उमेदवारी देण्यासाठी भाजप नेत्यांनी सूत्रे आती घेतल्याची माहिती आहे.
ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र थेट उमेदवार पळवण्याची योजना शिंदे व फडणवीस आखत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. भाजपाचे मूरजी पटेल यांनी प्रचार सुरू केला असून अद्याप त्यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज अजूनही भरला गेला नसल्यानं या घटनांना दुजोरा मिळत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत.
गुरुवारी ठाकरे गटाकडून (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. अद्याप ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. दबाव टाकून त्यांना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे करत असल्याची माहिती आहे.
ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात?
अद्याप राजीनामा दिला नसल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण निर्माण झाली असून मुंबई महानगर पालिकेत कार्यरत असलेल्या लटके यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला असला तरी मात्र राजीनामा अद्याप मंजूर केलेला नसून त्यांना दबाव टाकून आपल्याकडे शिंदे घेत असल्याच्या चर्चा आहेत. राजीनामा मंजूर झाला नसल्याने निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.
3 नोव्हेंबरला मतदान
निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची पहिली निवडणूक असल्यानं ही निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम