मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी कोविड पॉझिटिव्ह आढळला आहे. कोविड पॉझिटिव्ह आढळताच अनंतला एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल अनंत अंबानी याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंतचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु असून तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
काही दिवसांपूर्वी अनंत मुकेश अंबानी यांच्या घरातील गणेशोत्सवात दिसला होता. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि असंख्य राजकारणी, बॉलीवूड अभिनेते अंबानीच्या घरी गणपती दर्शनासाठी आले होते. अनंतला समूहाच्या उर्जा व्यवसायाची दिलेली जबाबदारी, तसेच अनंतसाठी मुकेश अंबानींनी दुबईत खरेदी केलेले घर यांमुळे अनंत सध्या चर्चेत होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम