Air India च्या विमानाला हवेतंच लागली आग

0
19

अबुधाबी Abu Dhabi हून कालिकत Calicut ला जाणाऱ्या इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे Air India Express Flight अबुधाबी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे.

उड्डाण केल्यानंतर हवेत फक्त एक हजार फूट उंचीवर गेल्यानंतर विमानाच्या इंजिनला अचानक आग लागली. त्यानंतर विमानाचे अबूधाबी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

कारने घेतला अचानक पेट; पत्नीला प्रसूतीगृहाकडे नेताना दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. अबूधाबीहून कालिकतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट एक इंजिनला आग लागल्यानंतर परत आले विमानाने अबूधाबी विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या विमानात एकूण १८४ प्रवासी होते.

तसेच दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दिल्लीच्या IGI विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. या विमानात १४० प्रवासी होते.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here