अमरावती – अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील ज्या बेपत्ता तरुणीवरून खासदार नवनीत राणांनी मोठा गदारोळ घातला, त्या तरुणीने थेट राणांवर आरोप केले आहे. यामुळे नवनीत राणा ह्या तोंडघशी पडल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एका तरुणीला पळवून आंतरधर्मीय विवाह करण्यास भाग पाडून तिला डांबून ठेवल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ घातला होता. अखेर जेव्हा बेपत्ता तरुणी सापडल्यानंतर तिने पोलिसांना जबाब दिला असून आपण रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे म्हटले आहे. तसेच नवनीत राणा यांनी याला लव्ह जिहादचे वळण देऊन माझी बदनामी केली, असा गंभीर आरोप तरुणीने केल्याने ह्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. तसेच खासदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.
काय म्हटली तरुणी जबाबात ?
दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणीला साताऱ्याहून ताब्यात घेत अमरावतीला आणल्यानंतर तिचा जबाब घेत तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. तरुणीने जबाबात सांगितले की, कोणीही माझे अपहरण केले नाही. मी स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. पण आपल्याला रेल्वे प्रवास समजला नसल्याने एकाच्या सांगण्यात ही रेल्वे अमरावतीला जाते, म्हणून आपण साताऱ्यात पोहोचलो. दरम्यान ह्याला खासदारांनी लव्ह जिहादचे वळण देत माझी बदनामी केली, असा आरोप करत खासदार राणांनी माझी बदनामी थांबवण्याची मागणी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम