वडाळा | मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला आहे. मनोज जरांगे पाटील हे घराघरात पोहोचले आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
Nashik News | नाशिकमध्ये निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तूफान राडा
याचाच परिणाम म्हणून की काय एका विद्यार्थ्याने बारावीच्या पेपरमध्ये चक्क ’एक मराठा एक कोटी मराठा’ अशी सुरुवात करूनच राज्यशास्त्राचा पेपर लिहिण्यास सुरवात केलेली आहे. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे घडलेली आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा करणार राज्याचा दौरा; जरांगेंचा मेगा प्लॅन आला समोर
बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील आदर्श शिक्षण मंडळ बीबीदारफळ प्रसारक संचलित श्री. गणेश विद्यालय बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील हायस्कूलमध्ये बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने सहामाहीचा पेपर सोडवताना चक्क ’एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून सुरुवात केली. त्या विद्यार्थ्याने सहामाही परीक्षेचा २ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यशास्त्राचा पेपर दिला आहे. या राज्यशास्त्राच्या पेपरची सुरुवातच चक्क ’जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली आहे. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मनोज जरंगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवरदेखील दिसून येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम