Ajit pawar ; अजित पवारांची ठाणे-नाशिक ट्रेन वारी

0
49

Ajit pawar traveled in Vande bharat : राज्याचे नवनिर्वाचित दुसरे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

हा व्हिडिओ आहे अजित पवार यांनी वंदे भारत ट्रेन मध्ये प्रवास केल्याचा. उपमुख्यमंत्री पवार यांनी नाशिकपर्यंतचा प्रवास वंदे भारत ट्रेननं केला. यावेळी रेल्वेमधील प्रवाशांसोबत अजित पवार यांनी संवाद ही साधला. या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजित पवार म्हणजे कामाचा माणूस, आम्ही सामान्य नागरिक तुमच्याबद्दल आदर वाटतो…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर नक्की सांगा, अस सांगत त्या सूचनांची नोंद घेण्याच आपल्यासोबत असणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांना सांगितले.

अजित पवार यांनी ठाणे पासून नाशिकपर्यंत अजित पवार यांनी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. यावेळी प्रवाशांनी अजित पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.

 

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करत सहप्रवाश्यांसोबत चर्चा केली होती. त्याचा देखील व्हीडिओ असाच व्हायरल झाला होता. आज अजित पवारांनी देखील वंदे भारत ट्रेन ने प्रवास करत त्या व्हीडिओ ची आठवण करून दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here