Ajit pawar: भाजप मधल्याच काही लोकांना अजित पवार मुख्यमंत्री म्हणून नको आहेत काय ?

0
17

Ajit pawar: सत्ता संघर्षाचा निकाल लागेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होतील. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादा (Ajit Pawar) हेच पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या काही दिवसांपासून येत असतानाच भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी अजित दादांना डिवचले आहे. मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत “मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नाही तर १४५ आमदारांची गरज असते” असा खोचक टोला लावला आहे. त्यामुळे भाजप मधल्याच काही लोकांना अजित पवार मुख्यमंत्री म्हणून नको आहेत काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोहित कंबोज यांनी सदरील पोस्ट दुपारी डिलिट केली आहे. (Ajit pawar)

Talathi result: तलाठी भरती परीक्षेच्या उत्तरपत्रिका पाहता येणार..!

नेत्यांची मन जुळली, पण कार्यकर्त्यांची नाही…!

बुधवारी लालबागच्या राजासमोर एका कार्यकर्त्याने एक चिठ्ठी अर्पण केल्याने पुन्हा राजकारण पेटले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भाजपबरोबर जरी राष्ट्रवादी असली तरी कार्यकर्त्यांमध्ये अजूनही सख्ख्या जुळून येण्यासाठी वेळ लागणार आहे. भाजप आणि अजित पवार गटांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आहे हे या विधानावरून दिसून येत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जरी मन जुळली असतील तरी कार्यकर्त्यांची अजूनही मने जुळलेली नाहीत हेच या विधानावरून दिसून येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here