विमान प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज हवाई इंधनाच्या दरात ५% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान इंधनाचे दर सलग दहाव्यांदा वाढले आहे. विमानाने प्रवाशांना प्रवास करणं आता महागात पडणार.
एव्हिएशन इंधनाची किंमत राष्ट्रीय राजधानीत ५ टक्क्यांनी वाढवून प्रति किलो (₹१२३.०३ प्रति लीटर) झाली आहे. जेट इंधन, जे विमान कंपनीच्या चालू खर्चाच्या जवळपास ४०% भाग घेते, त्यांने या वर्षी नवीन उच्चांक गाठले आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून दर पंधरवड्याला जेट इंधनाच्या किमती वाढत आहेत. ६१८८ रुपये प्रति किलोलीटर इतकी दरात वाढ आयओसीकडून केली गेली .
३० मे रोजी विमान इंधनाचे नवीन दर लागू केले जाणार आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने विमानाच्या इंधन दरावरही त्याचा परिणाम झाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी राष्ट्रीय राजधानीत एटीएफच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. यावर्षी १ जानेवारीपासून हवाई इंधन जवळपास ६२ टक्क्यांनी महागले आहे.
स्थानिक कर आकारणीनुसार राज्यातील दर वेगळे –
- मुंबईमध्ये एअर टरबाईन फ्यूएलचा दर १२१,८४७.११ रुपये प्रति किलोलीटर
- दिल्लीमध्ये एअर टरबाईन फ्यूएलचा दर १,२३,०३९.७१ रुपये प्रति किलोलीटर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम