
देवळा ; बळीराजा आत्मसन्मान सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी बागलाण तालुक्यातील भाऊसाहेब अहिरे यांची निवड करण्यात आली . देवळा येथील महारोजगार केंद्राच्या वतीने या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .

मालेगाव येथे नुकत्याच झालेल्या बळीराजा आत्मसन्मान सेवा संघाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदी भाऊसाहेब अहिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी देवळा येथील महारोजगार केंद्राला सदिच्छा भेट दिली .
यावेळी संस्थापक भाऊसाहेब पगार यांच्या हस्ते अहिरे यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी बळीराजाचे कार्यकर्ते एकलव्यचे अध्यक्ष मोठाभाऊ दळवी, तालुका अध्यक्ष जनार्दन पवार ,मोठाभाऊ पवार ,अशोक पवार ,राहुल पवार, विकी अहिरे, नामपूर, केंद्राचे संचालक राजीव पगार, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भामरे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम