Marathwada | छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडावे यासाठी सुरू असलेल्या सर्व पक्षीय आंदोलनात पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह ५० आंदोलकांना ताब्यात घेतलेले आहे. सकाळी ११ वाजेपासून जालना रोडवर हे आंदोलन सुरु झाले होते.
दरम्यान, मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप करत यापूर्वीही माजी आमदार कल्याण काळे यांना व अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा साडेचार तासांनी पोलिसांनी माजी मंत्री राजेश टोपे व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण ५० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तसेच, पोलिसांनी हा रस्तादेखील वाहतुकीसाठी मोकळा केलेला आहे.
Nashik News | नामपूर मधील स्मशानभूमीत आढळले करणीचे साहित्य आणि तरुणांचे फोटो
मराठवाडा पाणी जन आंदोलन या समितीच्या वतीने मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे जनआंदोलनाची हाक देण्यात आलेली होती. मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या शासना विरोधात मराठवाड्यातील सर्व मंत्री, सर्व पक्षीय आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी आणि औद्योगिक संस्था, पाणी वापर सहकारी संस्था यांच्याकडून आज हे आंदोलन करण्यात आले होते.
त्यानुसार आज सकाळी ११ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरच या आंदोलनाला सुरवात झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर – जालना रोडवर रास्ता रोको सुरु केले. या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी मंत्री अनिल पटेल, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे हे सहभागी होते. दरम्यान, पोलिसांनी टप्या-टप्प्याने ह्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
Nashik news | शिवमहापुराण कथेसाठी हजारो खान्देशवासीयांचा नाशिकमध्ये मुक्काम
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम