आले रे आले गद्दार आले! ; अन् शिंदे गटाची अब्रूच काढली

0
44

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सेनेच्या चाळीस आमदारांनी बंड करत राज्यात सत्तांतर घडवले, या बंडा नंतर विधीमंडळ अधिवेशनाला पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकार आज सामोरे जात आहे. मात्र सामोरे जातांना त्यांना मोठा सामना करावा लागला आहे. पहिल्या दिवशी विरोधकांनी एकजुटीने आक्रमक होत विधानभवनाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत सेना बंडखोरांना डिवचले. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांवर शिवसेना व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत चिडवल शिंदे गटाचे आमदार विधानभवनात येत असताना ‘आले रे आले, गद्दार आले’ अशी घोषणाबाजीने आवाज घुमला अन् शिंदे गटाचे आमदार खाली मान घालून मधे गेले.

आज पासून अधिवेशनाचा सुरवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाबाहेर विरोधक प्रचंड आक्रमक झालेले बघितले. सेना , राष्ट्रवादी, काँगेस आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी राज्यात ओला दुष्काळ लागू करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करत चुणूक दाखवली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांकडून ही घोषणाबाजी सुरू असताना, शिंदे गटाचे आमदार विधिमंडळात एकत्रित जात होते. त्यांना पाहून विरोधकांनी ‘आले रे आले, गद्दार आले’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली.

हे गद्दार सरकार कोसळणारच’
या घोषणाबाजी वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हटले की, “आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्या विरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार असल्याचा हल्लाबोल आदित्य यांनी केला.

ठाकरे यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपावर टीकास्त्र सोडले आहे. जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झाले आहेत. काहींना आधीच्या तुलनेत कमी महत्त्वाची खाती मिळाली असून. त्यांचे निष्ठावंत होते, जो पहिला गट गेला त्यांना काहीच मिळालेलं नाही. म्हणजे या गद्दारांनी पुन्हा एकदा दाखवलं आहे की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना देखील स्थान नाही. ज्या लोकांची निष्ठा एका माणसासोबत राहिली नाही, एका पक्षासोबत राहिली नाही, ते अशा लोकांसोबत कसे राहतील त्यांना तिथे जाऊन काहीच मिळाले नाही असेही ठाकरे यांनी सांगितले.

शिंदेचं पहिलं अधिवेशन, विविध मुद्द्यांवरून खडाजंगी

मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली असून याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता वाढली आहे. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर असल्याने मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असल्याचं चित्र बघायला मिळते का हे बघणे महत्वाचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here