सुबोध भावेच्या नव्या भूमिकेवर नेटकरी नाराज ! सोशल मिडीयावर प्रतिक्रियांचा पाऊस

0
37

मुंबई – मराठी सिनेअभिनेता सुबोध भावे काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. आता कालच सुबोधने आपल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला. मात्र त्यावर सोशल मिडीयात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

अभिनेता सुबोध भावे लवकरच “हर हर महादेव” ह्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सुबोध प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे करणार असून झी स्टुडीओजद्वारे ह्या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा पाच भाषेतून येत्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/CiCf86LN1KK/?utm_source=ig_web_copy_link

अनेकांनी ह्या नव्या लूकचे कौतुक केले असले, तरी काहींना मात्र त्याचा हा लूक भावला नाही. नेटकऱ्यांनी महाराजांच्या चेहऱ्यावरील मुद्रा जशी आक्रमक आहे, तशी ह्या लूकमध्ये दिसत नाही. तसेच अनेकांनी आतापर्यंत विविध चित्रपट व मालिकांमध्ये शिवरायांची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हे, शंतनू मोघे, शरद केळकर ह्यांना ही भूमिका देण्याचे व्यक्त केले. तर काहींनी ज्येष्ठ अभिनेते सुर्यकांत मांढरे यांच्या भूमिकेचे स्मरण केले आहे.

अनेकांनी मात्र सुबोधच्या या नव्या भूमिकेचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्यात. याआधी काही दिवसांपूर्वी सुबोधने एका कार्यक्रमात एक वक्तव्य केले होते, त्यावर अनेकांनी सुबोधला ट्रोल केले होते. त्यानंतर सुबोधने आपले स्पष्टीकरण मांडले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here