Pune crime – पोलीस उपायुक्ताने पत्नी व पुतण्याची हत्या करत स्वतःही संपवले जीवन ; पुणे हादरले

0
28

Pune Crime : पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असतानाच आता शहराला हादरवून टाकणारी घटना नुकतीच घडली आहे. पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या केली. व त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे.

सोमवारी म्हणजे २४ जुलैला पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पत्नी व पुतण्याला ठार करत स्वतः आत्महत्या केल्याने या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

भरत गायकवाड अस मृत पोलीस अधिकाऱ्याच नाव असून त्यांनी हे पाऊल का उचलले? याच कारण पोलिसांच्या चौकशीनंतर समोर येणार आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंब हे पुणे शहरात वास्तव्यास होते. अज्ञात कारणातून त्यांनी सोमावारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आपल्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर पुतण्यावर गोळी झाडली. या दोघांच्या खुनानंतर भरत यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मोनी गायकवाड (वय 44) असे भरत यांच्या मृत पत्नीचे नाव आहे. तर दीपक गायकवाड (वय 35) हा त्यांचा पुतण्या आहे.

https://thepointnow.in/crime-in-chandrapur/

घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भरत गायकवाड यांचे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला होते. नेमक पुतण्या व पत्नीची हत्या करण्याचे आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचे कारण काय? घटनास्थळी काही पुरावे किंवा काही चिठ्ठी आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतर मिळणार आहेत. मात्र या घटनेनंतर पोलीस दल व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here