भीषण अपघात – भरधाव कारची 17 महिलांना धडक; तिघींचा मृत्यू?

0
43

द पॉईंट नाऊ ब्युरो : पुणे-नाशिक महामार्गावर खरापुडी फाटा येथे भयानक अपघाताची घटना घडली आहे. यात एका कारने 17 महिलांना उडवल्याचे सांगण्यात येत आहे.

BMC Election: बीएमसी निवडणुकीत पीएम मोदी ठाकरेंचा विजयी वारू रोखणार? वाचा काय आहे स्थिती

पुण्याच्या खेड तालुक्यातील शिरोली येथे स्वयंपाकासाठी या महिला गेलेल्या होत्या. रस्ता ओलांडत असतांना, एका कारने त्यांना धडक दिली. ज्यात 7 महिलांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 3 महिलांचा या घटनेत मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या महिला मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी जात असतांना, कारने त्यांना धडक दिली. यात तिघींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर जखमींवर चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालक फरार झालेला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here