Abhijit bichukle anand Dave :रासने धनगेंचे जाऊद्यहो बिचुकले अन् दवे यांना किती मतं मिळाली ते एकदा बघाच

0
12

Abhijit bichukle anand Dave : राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष आपला उमेदवार जाहीर करत असतांना दोन आपले लक्ष वेधून घेतले. त्यात बीचुकले तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत तर दुसरे म्हणजे हिंदू महासंघाचे आनंद दवे हे कायम वृत्त वाहिनीवर लोकांना सल्ला देण्याचे काम करतात. दोघांनी विजय आमचाच होईल असा दावा केला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी धनगे आणि रासने यांचे काही खरे नाही असे म्हणत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Abhijit bichukle anand Dave )

Bjp fail: कसब्यात भाजपाचा टांगा पलटी; चिंचवड मध्ये अब्रु राखली

सहाव्या फेरी अखेर अभिजीत बिचुकले यांना अवघी चार मतं मिळाली तर दुसरीकडे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी विजयाचा दावा केला होता त्यांना तिसऱ्या फेरीपर्यंत अवघी 12 मते मिळाली आहे. तर सहाव्या फेरी अखेर त्यांना 100 मतं मिळाली आहे. यामुळे नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणात आता या दोघांना ट्रोल केले आहे.

जिथे निवडणूक असेल तिथं वादग्रस्त वक्तव्य करत प्रचार करणारे बिचुकले यंदा कसबा पोटनिवडणूक उभे ठाकले आणि थेट आदित्य ठाकरेंना आवाहन देण्याचे काम त्यांनी केले. तसेच आनंद दवे हे देखील मैदानात असल्याने दोन्ही उमेदवार चर्चेत होते. मात्र, यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात खरी लढत पाहायला मिळाली यात रवींद्र धंगेकर यांनी विजयश्री खेचली आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर यांनी मोठी आघाडी घेत विजयश्री खेचलं हेमंत रासने यांना मोठा धक्का दिला आहे. यात भाजपाच्या बलेकिल्ला असणाऱ्या पेठांमध्येही धंगेकर यांनी आघाडी घेतली ही महत्वाची बाब असून भाजपाला आत्मपरीक्षण करायला लावणारी ही निवडणूक ठरली आहे.

ज्यावेळी निवडणूक पक्रिया जाहीर झाली तेव्हा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी माझाच विजय होणार असल्याचा छातीठोक दावा केला होता. टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण नाराज असल्याचे सांगत निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला होता. यामुळे नेमक विजयाचे गणित काय याकडे सर्व्यांचे लक्ष लागले होते.

नेट कऱ्यांचे आवडते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही माझा विजय होईल. मी या मतदार संघात राहणार असल्याचे सांगत जनता या राजकारण्यांना वैतागली असल्याची टीका करत माझा विजय होईल असा दावा केला होता. मात्र बीचकुले यांना अवघी 4 मते मिळाल्याने हे भाग्यवान मतदार कोण अशी चर्चा नेटकऱ्यानी सुरू केली.

मात्र बिचुकले आणि दवे यांनी उमेदवारी केली असली तरी त्यांना पहिल्या तीन फेरीपर्यन्त बोटावर मोजण्या इतकीच मतं मिळाली आहे. त्यामुळे बिचुकले आणि दवे यांना किती मतं मिळाली यावर सोशल मिडियावर चर्चा होऊ लागली आहे. त्यामध्ये बिचुकले यांना आवगी चार मतं सहाव्या फेरीच्या अखेर पर्यन्त मिळाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here