मुंबई – मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून, सुप्रीम कोर्टाने पुढील आदेश देईपर्यंत कुठलीही वृक्षतोड न करण्याचा आदेश मुंबई मेट्रोला दिले आहे. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सर्वात पहिले आरेच्या जंगलात होणाऱ्या मेट्रो कारशेडला मंजुरी दिली होती, यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरली, आंदोलने झालीत. पण सरकारने यावर कानाडोळा करत वृक्षतोड करण्यास सुरुवात केली. अखेर ह्या वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, त्यावर आज सुनावणी झाली.
एकही झाड तोडलेले नाही, पण आरेतील वाढलेले तण काढण्यात आले, तसेच काही फांद्याची काटछाट करण्यात आली असल्याचे सांगत कोणतीही वृक्षतोड केली नसल्याचा दावा मुंबई मेट्रोने सुप्रीम कोर्टात केला आहे. आता ह्या प्रकरणावर येत्या १० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत जंगल परिसरात कोणतीही वृक्षतोड करण्यास कोर्टाने मनाई केली आहे.
ह्या स्थगितीमुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे तर पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. आरेच्या जंगलात वृक्षतोड केल्याने पर्यावरणाला हानी पोहोचेल, तसेच ह्याचे गंभीर परिणाम मुंबईकरांना बसणार असल्याचे अनेकांनी वारंवार सांगितले आहे. ह्याच कारणामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ह्या प्रकल्पाला स्थगिती दिली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम