स्वप्निल अहिरे
प्रतिनिधी : तालुक्यातील आराई येथे धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते १.७५ लक्ष रुपयाच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी खासदार सुभाष भामरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करून आणलेल्या मुख्यमंत्री पेयजल योजना, गावात राजमाता जिजाऊ शॉपिंग सेंटर, ग्रामपंचायत कार्यालया सभागृह, अशा विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दिलीप बोरसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील हे होते.
फटाक्यांच्या आतिषबाजीणे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.खासदार व इतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळेस शिव चरीत्र व्याख्याते उद्धव शेरे पाटील, सिंदखेडराजा यांचे शिवचरित्र व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी गावाचा विकास करणे हाच केंद्राचा मुख्य उद्देश असून विविध विकास कामाच्या माध्यमातून खासदार निधी गावासाठी उपलब्ध करून दिला आहे जात आहे. आराई हे गाव मुलीचे असल्याने विशेषतः गावावर माझे प्रेम आहे. तसेच गावाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. विविध योजना राबवून शेतकर्यांच्या समस्या सुध्दा सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार सुभाष भामरे यांनी या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलून दाखविली.
कार्यक्रम प्रसंगी गावातील नागरिक देविदास अहिरे यांनी कांदा निर्यात बंदी व भावाविषयी ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याने आपण याबाबत केंद्रात पंतप्रधान मोदीसाहेबांकडे चर्चा करावी जेणेकरून शेतकरी सुखी राहू शकेल असे सांगितले असता भामरे यांनी मी नक्कीच यासाठी आग्रही आहे व असेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गोकुळ अहिरे यांनी केले. या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती ज्योतीताई, अहिरे, लोकनियुक्त सरपंच मनिषा अहिरे, डॉ. प्रशांत दादा पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक माधव काका आहिरे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य माधवराव आहिरे, उपसरपंच अनिल माळी, ग्रामपंचायत सदस्या पुष्पलता अहिरे, साधना अहिरे, निर्मला भामरे, देवूबाई माळी, गोविंद भदाणे, वेनुबाई माळी, सिंधुबाई अहिरे, सोनाली सोनवणे, विजया बोरसे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकुमार आहिरे, विस्तार अधिकारी पाटील साहेब, दिलीप अहिरे, परशुराम आहिरे, देवराव पंडित अहिरे, पोपट पंडित अहिरे, बाबाजी सोनवणे, योगेश अहिरे, अशोक अहिरे, माजी सरपंच बापू सोनवणे, शिव शंभू संघटना पदाधिकारी जितुबापू सूर्यवंशी, आनंद दाणी, रविराज बच्छाव, गोरख चव्हाण, कैलास पवार, ग्राम विकास अधिकारी सुभाष भामरे, लिपिक स्वप्निल अहिरे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रविण सोनवणे, वसंत भदाने, भाऊसाहेब अहिरे, भारत अहिरे, गौतम गरुड आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम